esakal | काय सांगता! सोमवारी 'या' प्रकरणी मुंबईत एकही गुन्हा दाखल नाही; वाचा सविस्तर बातमी..
sakal

बोलून बातमी शोधा

mask

कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहे.

काय सांगता! सोमवारी 'या' प्रकरणी मुंबईत एकही गुन्हा दाखल नाही; वाचा सविस्तर बातमी..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहे.मुंबईत कोरोनाचे दिवसेंदिवस नवीन रुग्णांचा आकडा समोर येतो. त्यामुळे आणखीनच चिंता वाढली आहे. 

बाहेर फिरताना मास्क वापरणं सक्तीचं करण्यात आलं आहे. मात्र तरी सुद्धा काही बेजबाबदार नागरिक मास्क घालत नाही. त्यामुळे पोलिसांनी अशा नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली. याच नियम न पाळणाऱ्या नागरिकांसाठी पालिकेनं नवे नियम आणलेत. मास्क वापरण्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेनं नवा आदेश जारी केला आहे. 

हेही वाचा: कोरोनाची भीती दाखवून रुग्णांची लूट; कल्याण पूर्वेतील धक्कादायक प्रकार...

यापुढे जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.  दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी मुंबईत मास्क न घातल्या प्रकरणी एक ही नोंदवण्यात आलेला नाही. 

अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स, पोलीस, नर्सेस अहोरात्र मेहनत घेताहेत. अशातच कोरोनाला रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणं, सॅनिटायझरचा वापर करणे तसंच सोशल डिस्टन्सिंग ठेवणं हे महत्त्वाचं आहे. तोंडाला मास्क लावूनच बाहेर फिरणं प्रशासनानं अनिवार्य केलं आहे. मास्क न वापरणाऱ्या लोकांवर 18 मार्च ते आता जून महिन्यापर्यंत 2076 जणांवर पोलिसांनी आतापर्यंत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या शिवाय 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी जमणे, कलम 188 चे उल्लघंन केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 14 हजार 877 जणांवर गुन्हे नोंदवलेत. 

तसंच नागरिकांनी गरजे व्यतिरिक्त बाहेर पडू नये, पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमू नये, तसेच तोंडाला मास्क वापरणे सक्तीचे केले असताना. अनेकदा बेशिस्त नागरिक या नियमांची पायमल्ली करताना दिसतात. 

मास्क लावा नाहीतर मोजा एक हजार रुपये:

मास्क वापरण्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेनं नवा आदेश जारी केला आहे. यापुढे जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.  महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी एक परिपत्रक प्रसिद्ध करून कारवाईचे आदेश दिलेत. पालिका प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा: वीजबिल जास्त येण्यामागची 'ही' आहेत कारणं, 'म्हणून' बसलाय तुम्हाला वीजबिलाचा शॉक

सार्वजनिक स्थळं, प्रवास यासह खासगी वाहनांमध्येही प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक असल्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने दिले केले आहेत. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्यासह भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. पोलिस तसेच महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांना ही दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

no FIR against anyone in mumbai for mask