बिलनची नागीन निघाली....या गाण्याचे संगीतकार रत्नाकर ठाकूर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnakar Thakur passed away

बिलनची नागीन निघाली....या गाण्याचे संगीतकार रत्नाकर ठाकूर यांचे निधन

मुंबई : बिलनशी नागीन निघाली....या गाण्याचे संगीतकार रत्नाकर ठाकूर (वय ८४) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्च्यात पत्नी आहे. त्याच्या पार्थिवावर देवनार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

रत्नाकर ठाकूर हे हार्मोनियम उत्तम वादक होते. बिलनशी नागीन निघाली हे त्यांनी संगीतबद्ध केलेले गाणे लोकप्रिय गायिका उत्तरा केळकर यांनी गायलेले आहे. परेश ठाकूर यांनी ते लिहिलेले आहे. हे गाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. व्हिनस कंपनीने या गाण्याचा अल्बम काढला आणि अल्पावधीतच तो लोकप्रिय ठरला. त्यानंतरही त्यांनी कित्येक गाण्यांना संगीत दिले.

Web Title: Nagin Song Composer Ratnakar Thakur Passed Away Great Harmonium Player Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsSakalmusic
go to top