मुंबई - गाणी ऐकण्यासाठी घेतलेला मोबाईल देईना म्हणून मित्राची हत्या

Mobile Hanging problem
Mobile Hanging problemesakal
Summary

मोबाइल देत नसल्याच्या रागातून मित्राचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबई - मोबाइल देत नसल्याच्या रागातून मित्राचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपाडा इथं ही घटना घडली असून वॉर्ड बॉय असणाऱ्या सन्मान सावंत याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सन्मान सुधीर सावंत असे मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी दिलीपकुमार हरिकिशन राम (वय २४) याला अटक केली आहे. आरोपी दिलीपकुमार आणि मृत सन्मान हे दोघंही एकमेकांचे मित्र असून एकाच परिसरात राहण्यास आहेत.

Mobile Hanging problem
चंद्रकांत हंडोरे यांना जीवे मारण्याची सुपारी; टिळकनगर पोलिसांत गुन्हा दाखल

दोघंही एकत्र फिरत असताना आरोपींचा गाणे ऐकण्यासाठी घेतलेला मोबाइल परत दिला नाही. याचा राग अनावर झाल्याने दोघांमध्ये गुडलक इंजनिअरिंग वर्क्स स्कूलच्या समोर भांडण झालं. त्यावेळी आरोपी दिलीपकुमारने सन्मानला जोरदार धक्का दिला. त्यावेळी सन्मान हा गाड्यांमध्ये जाऊन पडला. त्यावेळी त्याच्या डोक्याला मार लागला. हे पाहून आरोपी़नी पळ काढला. या प्रकरणी नागपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com