Chandrakant handore
Chandrakant handoregoogle

चंद्रकांत हंडोरे यांना जीवे मारण्याची सुपारी; टिळकनगर पोलिसांत गुन्हा दाखल

चेंबूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (Maharashtra congress) कार्याध्यक्ष व मुंबई काँग्रेसचे प्रभारी माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे (chandrakant handore) यांना जीवे मारण्याची सुपारी (Murder plan) देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीविरोधात टिळकनगर पोलिसांनी एफआरआय दाखल (police complaint filed) केला आहे. नीलेश नानचे असे आरोपीचे नाव आहे. नीलेश हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. (Police complaint filed on nilesh nanche in chandrakant handore murder planning crime)

Chandrakant handore
कोरोना रुग्ण वाढले तरी वसई-विरारमध्ये इमारतींना सील नाही

गेल्या काही दिवसांपासून हंडोरे व त्यांच्यात धुसफूस सुरू होती. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाची तिकीट मिळणार नाही, याचा मनात राग ठेवून जीवे ठार मारण्याची सुपारी दिली होती. नानचे याच्या एका साथीदाराने हंडोरे यांना ही माहिती दिली असता शुक्रवारी हंडोरे व त्यांचे कार्यकर्ते यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. टिळकनगर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून नानचे याच्याविरोधात एफआरआर दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील चौकशी सुरू असल्याचे टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील काळे यांनी सांगितले. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com