'नाईकच्या शिक्षण संस्था या वर्षी बंद नको'

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

मुंबई - मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईक यांच्या वादग्रस्त शिक्षण संस्थेची चौकशी सुरू असली, तरी चालू शैक्षणिक वर्षात शिक्षण संस्था बंद केली जाऊ नये, असा प्रस्ताव शिक्षण विभागाने केंद्र सरकारला पाठवला असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

या शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या शिष्टमंडळाने तावडे यांची भेट घेतली. त्या वेळी तावडे यांनी या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठवला आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करण्याचा पर्याय समोर असल्याचे तावडे यांनी सांगितले.

झाकीर नाईक यांच्या मुंबईतील कार्यालयांची तपासणी राष्ट्रीय तपास संस्थेने सुरू केली आहे. त्या पाश्वभूमीवर त्यांच्या शिक्षण संस्थेवरदेखील टाच येण्याची भीती या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनाही वाटत आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने गेल्या दोन दिवसांपासून "इस्लामिक रिसर्च फाउंडेशन'ची कार्यालये ताब्यात घेऊन तिथे तपासकार्य सुरू केले आहे.

Web Title: Naik's educational institutions do not want to close this year