

Nalasopara Crime
ESakal
वसई : नालासोपारा येथे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका मुलाने पीडित मुलीला भेटायला बोलावले असता त्याने एका साथीदारासोबत अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. मात्र दिवसेंदिवस मुंबई शहरासह उपनगरांत वाढत असणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे लहानग्या मुलींसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.