esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Drugs

वसई : परदेशी नागरिकांकडून अमली पदार्थ जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नालासोपार : वसईच्या नायगाव पूर्व डॉन बास्को स्कूलजवळ अमली पदार्थ विकणाऱ्या (Drugs supply) तीन नायजेरियन व्यक्तींवर (Nigerian peddlers) कारवाई करून ११२६ ग्रॅम केटामाईन आणि १३ ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त केले. याची किंमत १० लाख ५६ हजार आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थविरोधी (Narcotic cell) पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा: दागिना बाजार येथे बंगाली बांधवांच्या रक्तदानाने ३११ युनिट रक्त संकलन

यात तीन नायजेरियन व्यक्तींना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. ओशिता डोझी चिबुझी (वय २६), ईझे ईकेने (२९), ईबुका किंग्सले अच्युनिलो (३२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. नायगाव पूर्व डॉन बास्को स्कूलजवळील साईदर्शन बिल्डिंगमध्ये ते अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस आयुक्त महेश पाटील, सहायक आयुक्त रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाचे प्रभारी निरीक्षक देविदास हंडोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

loading image
go to top