प्रदीप शर्मांना मिळू शकतं 'हे' मंत्रिपद; शर्मांच्या पुनर्वसनासाठी फिल्डिंग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

मुंबई : शिवसेनेचे उमेदवार एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नालासोपारा मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. प्रदीप शर्मा यांचं राजकीय पुनर्वसन करावं यासाठी एका गटाकडून लॉबिंग करण्यात येतंय. प्रदीप शर्मांना राज्यमंत्रीपद देण्याची मागणी नालासोपाऱ्यातील सामाजिक संघटनांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

मुंबई : शिवसेनेचे उमेदवार एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नालासोपारा मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. प्रदीप शर्मा यांचं राजकीय पुनर्वसन करावं यासाठी एका गटाकडून लॉबिंग करण्यात येतंय. प्रदीप शर्मांना राज्यमंत्रीपद देण्याची मागणी नालासोपाऱ्यातील सामाजिक संघटनांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

आपल्या एन्काऊंटरमुळे चर्चेत आलेल्या प्रदीप शर्मा हे निवडणुकीच्या आखाड्यात देखील प्रसिद्धी झोतात राहिले. त्यांच्या नावाभोवती असलेल्या वलयामुळे शिवसेनेने त्यांना नालासोपारा मतदारसंघातून उमेदवारी दिली. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्याशी निवडणुकीच्या रिंगणात दोन हात करण्यात शर्मा यशस्वी होतील अशी शिवसेना नेतृत्वाला अपेक्षा होती.

आणखी वाचा ::

आतली खबर.. शिवसेना आमदारांच्या बैठकीत 'ही' देखील झाली चर्चा ?

जनतेचा आम्हाला विरोधात बसावे असाच कौल : शरद पवार

कथोरे यांना मंत्रिमंडळात घ्या; मुरबाडच्या नागरिकांची मागणी
 

प्रदीप शर्मा यांनी आपल्या पोलुस खात्यातील सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन हाती शिवबंध बांधून राजकारणात एन्ट्री मारली. शर्मांनी क्षितिज ठाकूर यांना चांगली टक्कर दिली,मात्र विजय मिळवण्यात ते अपयशी ठरले. यामुळे प्रदीप शर्मा यांचं आता काय होणार हा प्रश्न त्यांच्या समर्थकांना सतावू लागलाय. शिवसेनेने त्यांचं राजकीय पुनर्वसन कारावं यासाठी काही सामाजिक संघटना पुढे सरसावल्या आहेत.या संघटनांनी प्रदीप शर्मा यांना राज्यमंत्री पद देण्याची मागणी केली आहे.यासाठी पंचशिल सेवा संघाचे अध्यक्ष नविन लादे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले.

नालासोपारा, वसई व विरार सहित ठाणे-पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारी, दहशत,जनतेची आर्थिक फसवणूक,टँकर लॉबी आणि वाळू माफियांची दादागिरी मोडीत निघावी यासाठी प्रदीप शर्मांना ताकत देणं गरजेचं आहे.शिवसेनेसाठी आपली सरकारी नोकरी पणाला लावून शर्मांनी ठाकूर कुटुंबाशी दोन हात केले.अश्या व्यक्तीला वाऱ्यावर न सोडता त्यांना राज्यमंत्रीपद देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करावं अशी मागणी पंचशील सेवा संघाचे अध्यक्ष नवीन लादे यांनी केली.

WebTitle : nalasopara shivsena candidate pradip sharma might become minister of state


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nalasopara shivsena candidate pradip sharma might become minister of state