नाना पाटेकर यांना मातृशोक, वयाच्या 99व्या वर्षी आईचे निधन

नाना पाटेकर यांना मातृशोक, वयाच्या 99व्या वर्षी आईचे निधन

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना मातृशोक झाला आहे. नानांची आई निर्मला गजानन पाटेकर यांचे आज (ता.29) मंगळवारी मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 99 वर्षांच्या होत्या. 

मुंबईतील ओशिवरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नाना पाटेकर यांच्यासोबतच त्यांच्या परिवारातील लोकांसोबत चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित होते. नाना पाटेकर यांचे वडील गजानन पाटेकर यांचा प्रिटिंग प्रेसचा व्यवसाय होता यामुळे ते मुंबईत राहत असत. तर, नाना पाटेकर यांनी आपल्या आईसोबत बराच कोकणातल्या आपल्या गावी घालवला होता.
 
निर्मला यांना एकूण सात मुले होती. परंतु यातील पाच मुलांचा लहानपणीच मृत्यू झाला. यानंतर नानांच्या आईने नाना आणि त्यांचे मोठ्या भावाचे संगोपन केले. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नाना पाटेकर यांच्या आईला स्मृतीभ्रंश झाला होता. त्या जवळच्या माणसांनाही ओळखत नव्हत्या. नाना पाटेकर यांच्या आईच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलावंतांनी नाना पाटेकर यांना भेटून त्यांचे सांत्वन केले. नाना पाटेकर आणि त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यावेळी हजर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com