आपात्कालीन परिस्थितीसाठी मेल-एक्‍स्प्रेसमध्ये डॉक्‍टर!

आपात्कालीन परिस्थितीसाठी  मेल-एक्‍स्प्रेसमध्ये डॉक्‍टर!

मुंबई : आपत्कालीन परिस्थितीसाठी लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये डॉक्‍टर असावेत, म्हणून रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरवठा करू, असे आश्‍वासन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे डेक्कन क्वीनला भेट देऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) उपक्रमांचा मंगळवारी आढावा घेतला.

मंगळवारी शताब्दी एक्‍स्प्रेसमध्ये शिळे ब्रेड-बटर खाल्ल्यामुळे ३६ प्रवाशांना त्रास झाला. या घटनेची विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर दखल घेतली. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी डॉक्‍टर असावेत. त्यामुळे प्रवाशांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळेल. या संर्भात रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. 

विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत पसरलेल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीनवर लावण्यात आली आहेत. एमटीडीसीच्या अशा उपक्रमांमुळे विदर्भातील दुर्लक्षित पर्यटनस्थळांच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्‍वास पटोले यांनी व्यक्त केला. देश आणि राज्यातील अन्य मेल-एक्‍स्प्रेसवरही महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची प्रसिद्धी करावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

आणखी १० एक्‍स्प्रेसवर पर्यटनस्थळे
नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे डेक्कन क्वीनवर लावण्यात आली आहेत. या उपक्रमाला पर्यटकांचा किती प्रतिसाद मिळतो, याची तीन महिने पाहणी केली जाईल. त्यानंतर वर्षभरात आणखी १० एक्‍स्प्रेसवर वेगवेगळ्या पर्यटनस्थळांना प्रसिद्धी दिली जाईल, असे एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com