काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोलेंचे नाव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

मुंबई : महाविकासआघाडीच्या सरकारची बहुमतचाचणी आज सिद्ध होईल. यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपकडून किसन कथोरे विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा नवनिर्वाचित मंत्री जयंत पाटील यांनी आज (ता. 30) सभागृहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूने मतदान करावे, असा पक्षादेश काढला आहे.

नाना पटोले साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. भाजपतून बाहेर पडत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यापूर्वी ते भाजपकडून खासदार झाले आहे. आता त्यांच्याविरोधात भाजप विरोधी पक्षाच्या बांकावर बसेल.

राष्ट्रवादीचा बहुचर्चित व्हिप, अजित पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष

याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, "आज विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. महाविकास आघाडीकडे 170 चा  आकडा आहे. विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच होईल.. भाजपने उमेदवार दिला असला तरीही त्यांचा पराभव निश्चित आहे. राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्रीपद कोणाकडे असावे याकरिता सिल्वर ओक वर चर्चा सुरू असावी. विश्वासदर्शक ठरावापूर्वी महाविकास आघाडीची बैठक होईल.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ म्हणाले, "विश्वासदर्शक ठराव न मांडता आल्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार पडले. आज आम्ही बहुमत सिद्ध करू. आज काठावर किती लोक आहेत हे सांगून मला संभ्रम तयार करायचा नाही. आकडा 165 च्या वर जाऊ शकतो. पर्यावरणाचा ऱ्हास करून विकास नको म्हणून मेट्रो कारशेडला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nana Patole submits form for Maharashtra Assembly speaker from Congress