esakal | नाना पटोलेंना डावलून नेमणुका? IElection
sakal

बोलून बातमी शोधा

Nana-Patole

नाना पटोलेंना डावलून नेमणुका?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : निवडणुकांत विरोधकांशी लढण्याच्या वेळी म्हणजे, निवडणुका तोंडावर आल्या तरी; काँग्रेसमधील गटबाजी काही संपत नसल्याचे दिसत आहे. साधारणपणे सव्वा महिन्याआधी २५० हून अधिक जणांची प्रदेश कार्यकारिणी जाहीर होऊनही याच कार्यकारिणीत आणखी ५० कार्यकर्त्यांची भरती करण्यात आली आहे. गंभीर म्हणजे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर मंत्र्यांनी डावलेल्या मंडळींना नव्यात यादीत पद देऊन त्यांची बोळवण केल्याची चर्चा आहे. या नेमणुका दिल्लीतून झाल्याने पटोले यांच्यासाठी धक्काही मानला जात आहे.

हेही वाचा: के.व्ही.सुब्रमण्यम मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा देणार राजीनामा

दोन-तीन टप्प्यांत पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा झाली आहे. त्यामुळे या विस्तारित कार्यकारिणीला गटबाजीचे कारण जोडणे योग नसल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. निवडणुकांत सततचा पराभव पदरात पडल्यानंतरही पुन्हा उभारी घेण्याच्या उद्देशाने काँग्रेसमध्ये फारसे बदल होताना दिसत नाहीत. उलट नेत्यांमधील वाद वाढत असल्याची चर्चा आहे.

युवक काँग्रेसची ताकद वाढल्याचा दावा

ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत युवक काँग्रेसची ताकद वाढल्याचा दावा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला आहे. या पुढील काळातील निवडणुकांसाठी सर्व पातळ्यांवर तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

loading image
go to top