तुतीकोरीनची पुनरावृत्ती टाळा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 जून 2018

मुंबई - नाणार प्रकल्पावरून शिवसेना-भाजप संघर्ष सुरू असताना आज शिवसेनामंत्र्यांनी ‘लेटरबॉम्ब’चा प्रयत्न केला. तमिळनाडूतील तुतीकोरीन प्रकल्पाला विरोध केल्यानंतर झालेल्या गोळीबाराने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याचा दाखला देत तुतीकोरीनची पुनरावृत्ती टाळायची असेल तर नाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करा, असे पत्रच आज शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. 

नाणारच्या जाहीर सभेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा करत नव्या राजकीय वादाला तोंड फोडले होते. मात्र, उद्योगमंत्र्यांना अशाप्रकारे अधिसूचना रद्द करण्याचा अधिकारच नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करत पलटवार केला होता. शिवसेनेच्या कठोर विरोधानंतरही मुख्यमंत्र्यांनी नाणार भूसंपादनाची प्रक्रिया रद्द केली नाही, त्यामुळे आज शिवसेना मंत्र्यांनी एकत्रित पत्र लिहून देसाई यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी संमती द्यावी व नाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करावी अशी मागणी केली आहे. तुतीकोरीनमध्ये गोळीबाराची दुर्दैवी घटना घडली. मात्र, शिवसेना- भाजपच्या लोकाभिमुख सरकारच्या कार्यकाळात अशी काळी घटना घडू नये, अशी जनहिताची शिवसेनेची भावना असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले.

Web Title: Nanar Project issue