

Virar's Lifeline: Long-Awaited Narangi Flyover to Open on May 8
Sakal
विरार : विरार शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत कळीचा ठरणाऱ्या नारंगी रेल्वे उड्डाणपुलाचे अखेर ८ मे २०२६ रोजी लोकार्पण होत आहे. माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी शहराच्या भविष्यातील गरजा ओळखून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास आला असून, उद्यापासून हा पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.