भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या निवडणूक लढवण्याबाबत एक विधान केलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनी राणे यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. याच प्रकरणी आता नारायण राणे यांच्यावर खटला चालणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.