कोरोनाशी लढा तीव्र! रेल्वे स्टेशनवरही या गोष्टी उपलब्ध होणार...

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 7 July 2020

मास्क, फेस शिल्ड आणि सॅनिटायझर्स, आता निश्चित दराने रेल्वे स्थानक स्टॉल्सवर विकल्या जातील. रेल्वे स्थानक पूर्णपणे उघडल्यानंतर या वस्तूंची विक्री करण्यात येईल.

मुंबई- कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबईत सर्वाधिक रुग्ण दररोज आढळून येत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जातात. कोरोनापासून स्वत:चा बचाव करायाचा असेल तर मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करणं गरजेचं आहे. तसंच राज्य सरकारनं सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणंही बंधनकारक केलं आहे. सध्या दुकानं, मॉल अशा अनेक ठिकाणी मास्क, हॅण्ड ग्लोव्हज आणि सॅनिटायजरची व्यवस्था करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकतही मास्क आणि सॅनिटायजरची व्यवस्था करण्यात येणार आहे.

रोखठोक : संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत शरद पवार काय करणार खुलासा...

यापुढे मास्क, फेस शिल्ड आणि सॅनिटायझर्स, आता निश्चित दराने रेल्वे स्थानक स्टॉल्सवर विकल्या जातील. रेल्वे स्थानक पूर्णपणे उघडल्यानंतर या वस्तूंची विक्री करण्यात येईल. यामुळे शहराच्या बाहेर प्रवास करणार्‍या आणि बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना मदत होईल. सध्या संपूर्ण भारतात जवळपास 230 प्रवासी ट्रेन आणि 700 उपनगरीय ट्रेन मुंबईत 2 मार्गावर धावत आहेत. त्यामुळं या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता स्थानकातील स्टॉलवर कोरोनापासून सुरक्षा देणाऱ्या सर्व वस्तु मिळतील. महत्त्वाचं म्हणजे या सर्व वस्तू बाजारी भावातच विकण्यात येणार आहेत.

सुरक्षा प्रदान करण्यावर भर देण्यासाठी आणि प्रवाशांना आरोग्यदायी प्रवासाची सुविधा, स्थानकांवर असलेल्या स्टॉल्स धारकांना (एमपीएस) आता टेकवे वेची सुविधा सुरु करण्याची परवानगी दिली असून त्यात बेडरोल किट्स / वस्तू विक्री करण्यास सांगितलं आहे. तसंच इतर कोविड-19 संबंधित संरक्षणात्मक वस्तू जसे की मास्क, सॅनिटायझर्स, ग्लोव्हज इत्यादी वस्तूची विक्री करण्याचीही परवानगी दिली आहे. हे टेकवे बेडरोल किट / वस्तू आणि इतर संरक्षक वस्तू चांगल्या दर्जाचे असाव्यात आणि एमआरपीपेक्षा जास्त नसाव्यात असंही रेल्वेनं स्टॉल्स धारकांना सांगितलं असल्याचं मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यानं म्हटलंय.

लोकलचा भार कमी ठेवायचा असेल तर, दिवसाचे 24 तास कामाच्या भिन्न वेळा करण्याचा पालिकेचा विचार

मुंबई स्थानकांवरील स्टॉल्समध्ये लवकरच या जीवनावश्यक वस्तू मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स, कुर्ला एलटीटी अशा प्रमुख जंक्शनवर या स्टॉलवर उपलब्ध होणार आहे. तसंच, चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल या पश्चिम रेल्वेच्या स्थानकात अशाप्रकारचे स्टॉल सध्या सुरु आहेत.

कोविड-19 मुळे मुळे सध्या मुंबई स्थानकावरील सर्व स्टॉल्स बंद आहेत. त्यामुळे जेव्हा लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु होईल त्यानंतर या वस्तू स्टॉलवर उपलब्ध होतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai masks sanitisers and face shields for sale soon at railway stations