सुशांतसिंग राजपूत प्रकरणी सरकार एका मंत्र्याला पाठीशी घालतंय, नारायण राणेंचा घणाघात...

सुमित बागुल
Tuesday, 4 August 2020

या सर्व प्रकरणात महाराष्ट्र राज्य सरकार एका मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी केलाय.

मुंबई - सुशांतसिंग राजपूत प्रकरणाबाबत भाजप नेते नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी सरकारवर काही गंभीर आरोप केलेत. या प्रकरणी सरकार एका तरुण मंत्र्याला वाचवत असल्याचा घणाघात नारायण राणे यांनी केलाय. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशिवाय इतर विविध मुद्द्यांवरून नारायण राणे यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. यामध्ये राज्यातील कोरोना आणि मुंबईत आज पडलेला पाऊस आणि कोकणवासीयांना क्वारंटाईन करण्यावरून नारायण राणे यांनी सरकारवर निशाणा साधलाय. 

मोठी बातमी - गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी ST सज्ज, ई-पासची गरज नाही; पण आधी 'हे' नियम वाचून घ्या...

काय म्हणालेत नारायण राणे ? 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सध्या गाजतंय. सुशांतची आत्महत्या नाही असं मी ही म्हणतो. आत्महत्या झाली नसून सुशांतचा मर्डर झाला आहे. या प्रकरणात पन्नास दिवस झालेत तरीही स्पष्टता येत नाही. त्यामुळे सरकार सरकारमधील मंत्र्याला  वाचवण्याचा प्रयत्न करतंय असं नारायण राणे म्हणालेत. ८ तारखेला पार्टीला कोण कोण होतं ? त्या पार्टीतील उपस्थितांना का अटक करत नाहीत? एका ठराविक हॉस्पिटलमध्येच का नेलं जातं ? दिनो मोर्या कोण आहे त्याच्या घरात रोज मंत्री का येतात. असे एक ना अनेक प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केलेत. 

मोठी बातमी -  ST'ला राज्य सरकारकडून पुन्हा संजिवनी देण्याचा प्रयत्न; अर्थमंत्री अजित पवारांनी दिली इतक्या कोटींची मंजूरी

दिशा सालियनचीही हत्याच 

सुशांतची मॅनेजर दिशाने आत्महत्या केली असं म्हणतात. त्यानंतर तिला भगवती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. दिशाच पोस्टमार्टम झालं. दिशाने आत्महत्या केली नाही तर तिची देखील हत्या करण्यात आली होती, असंही नारायण राणे म्हणालेत. दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. तिच्या गुप्तांगावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. अनेक ठिकाणी अशा जखमा आहेत. वरून पडून अशा जखमा होत नाहीत, असाही मुद्दा नारायण राणे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, या सर्व प्रकरणात महाराष्ट्र राज्य सरकार एका मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी केलाय. 

narayan rane targets maharashtra government in sushant singh rajapur case 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narayan rane targets maharashtra government in sushant singh rajapur case