NCB कडून दीपिका, श्रद्धा, सारा आणि रकुलचे मोबाइल फोन जप्त

पूजा विचारे
Sunday, 27 September 2020

अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह या चार अभिनेत्रींचे मोबाइल फोन जप्त केलेत.

मुंबईः अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह या चार अभिनेत्रींचे मोबाइल फोन जप्त केलेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातली माहिती दिली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत हा ड्रग्जचं सेवन करायचा, अशी कबुली अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरने एनसीबीच्या चौकशीत दिली आहे. तर  ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणची करण्यात आलेल्या साडेपाच तासाच्या चौकशीत दीपिकाने ड्रग्ज चॅट केल्याची कबुली दिली आहे. 

दीपिका पदुकोण, सारा अली कान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीति सिंह, सिमोन खंबाटा, करिश्मा आणि जया साहा यांचे फोन जप्त करण्यात आलेत. या फोनमधील डाटाच्या आधारे अनेक मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या जप्त फोनमधील डिलीट केलेला डेटा देखील एनसीबी मिळवू शकते. त्यामुळे या फोनच्या आधारे सर्व अभिनेत्रींबाबत एनसीबीच्या हाती मोठी माहिती लागण्याची दाट शक्यता आहे. 

अधिक वाचाः  आधीच कंगाल असलेली 'बेस्ट' मंत्र्यांवर मात्र मेहरबान; चार ते पाच महिन्यांपासून वीज बिल नाही
 

दीपिकानं ड्रग्ज चॅट केल्याची कबुली दिली असून आपण ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं सांगितलं. तर सारानंही ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं एनसीबीला सांगितलं. दीपिकाची मॅनेजर करिश्माला दीपिकासमोर बसवून तिची चौकशी करण्यात आली.  तब्बल साडेपाच तासाच्या प्रश्नांच्या सरबत्तीनंतर दीपिकाची चौकशी संपली आहे. एनसीबीच्या विशेष पथकाने कुलाबा येथील विश्राम गृहावर  दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशची चौकशी करण्यात आली.

अधिक वाचाः  राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया

एनसीबीने शनिवारी अभिनेत्री श्रद्धा कपूर, सारा अली खान यांच्याकडे चौकशी केली. सुशांतसोबत काम करणाऱ्या या दोन अभिनेत्रींची चार ते पाच तास चौकशी करण्यात आली.

Narcotics Control Bureau seized Deepika Padukone Sara Ali Khan Shraddha Kapoor mobile phones


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narcotics Control Bureau seized Deepika Padukone Sara Ali Khan Shraddha Kapoor mobile phones