NCB कडून अभिनेता अर्जुन रामपालला पुन्हा समन्स, उद्या होणार चौकशी 

NCB कडून अभिनेता अर्जुन रामपालला पुन्हा समन्स, उद्या होणार चौकशी 

मुंबईः  काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याचं नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आलं. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये असलेल्या अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींची चौकशी एनसीबीद्वारे केली जात आहे. त्यातच अर्जुन रामपालचंही आलं होतं. याआधी अर्जुनची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा एनसीबीनं अर्जुन रामपालला समन्स बजावला आहे. एनसीबीनं १६ डिसेंबर म्हणजेच उद्या अभिनेत्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत. 

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी एनसीबीनं छापा टाकला होता. त्यानंतर अर्जुन रामपाल यांना एनसीबीनं समन्स बजावले. त्यानुसार अर्जुन रामपाल चौकशीसाठी हजर देखील झाला होता. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकानं अभिनेत्याची चौकशी केली. दरम्यान  अर्जुन रामपाल यांच्या एका खास मित्राला एनसीबीनं अटक केली होती. 

 
एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपालच्या घरावर छापेमारी केली होती. अर्जुन रामपालच्या वांद्र्यातील घराची झडती घेतली होती. त्यावेळी एनसीबीने अर्जुनच्या घरातून त्याचा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि टॅब जप्त केला होता. त्यानंतर त्याच्या वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आलं होतं.  

याप्रकरणी एनसीबीने अर्जुन रामपाल लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डिमेट्रिएड्स हिची देखील चौकशी केली.  गॅब्रिएलाची देखील एनसीबीने सलग दोन दिवस 6-6 तासांसाठी चौकशी केली होती. गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेण्यात आलं होतं. अॅगिसिलोस हा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. अॅगिसिलोस हा एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com