भाईंदर : मिरा भाईंदर, वसई विरार पोलिसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत महिन्याभरात १ कोटी ९० लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणात ४९ जणांना अटक करण्यात आली आहे..मिरा-भाईंदर, वसई विरार शहरात अमली पदार्थांच्या खरेदी विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तीन परीमंडळाच्या कार्यक्षेत्रात महिनाभर विशेष मोहीम राबवण्यात आली. यावेळी पथकाने केलेल्या कारवाईत ४० लाख १९ हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तर १२ जणांना अटक करण्यात आली आहे..Vasai Crime: महिलेने प्रियकराला संपवलं; पती आणि भावाने दिली साथ, ब्लाइंड मर्डर मिस्ट्रीची कशी उकल झाली?.याव्यतिरिक्त पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने स्वतंत्रपणे केलेल्या कारवाईत ९ लाख ३२ हजारांचे अमली पदार्थ जप्त करून १४ पुरुष व एका महिलेला अटक केली आहे. तर २ परदेशी व्यक्तींचा समावेश आहे. शिवाय अमली पदार्थ सेवन करणाऱ्या ४२२ गुन्हे दाखल केले आहेत. तर गांजा सेवन करणाऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत..विभाग कालावधी जप्त मुद्देमालपरीमंडळ १ - २० ते २६ एप्रिल - १ कोटी १० लाखपरीमंडळ २ - २८ ते ४ मे - २४ लाख १७ हजारपरीमंडळ ३ - ६ ते १२ मे - ५ लाख ६६ हजारदाखल गुन्हे - ३४ गुन्हे, अटक आरोपी २५.Navi Mumbai: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय बिझनेस सेंटर उभारणार! CIDCO चा मोठा प्रकल्प; व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.