
Summary
अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कार्यक्रमादरम्यान एशियन पेंट कंपनीचे कर्मचारी आणि नागरिकांनी घोषणाबाजी करून मागण्या मांडल्या.
कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री पुढच्या दौऱ्यावर निघाल्यावेळी ही घटना घडली.
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा किरकोळ अपघात घडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. चालकाने गाडी अचानक पुढे नेल्याने हा अपघात झाला, यात नरेंद्र पाटील यांनी किरकोळ जखम झाली आहे. ते खाली कोसळताच पोलिस कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना सावरले. मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.