Parliament Ratna: ठाणेचे खासदार नरेश म्हस्के यांना सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’; अभ्यासपूर्ण कामगिरीला राष्ट्रीय सन्मान

ठाणेचे खासदार नरेश म्हस्के यांना पहिल्याच टर्ममध्ये सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’ सन्मान; अभ्यासपूर्ण भाषण, प्रश्नोत्तरांतील सक्रियता आणि संसदेतील अव्वल उपस्थितीची दखल
Parliamentary Excellence: MP Naresh Mhaske and Dr. Shrikant Shinde Honored Again

Parliamentary Excellence: MP Naresh Mhaske and Dr. Shrikant Shinde Honored Again

Sakal

Updated on

ठाणे : आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महत्त्वाच्या विविध मुद्यांवर तसेच अर्थसंकल्पावर, सरकारच्या धोरणांवर बाजू भक्कमपणे मांडून संसदेसह देशाचे लक्ष वेधणारे,विविध विभागांवर प्रश्नोत्तरे विचारणारे ,संसदेतील उपस्थितीत अव्वल असणारे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना सलग दुसऱ्या वर्षी मानाचा `संसद रत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये नरेश म्हस्के यांना पहिला `संसद रत्न'  मागील वर्षी पुरस्कार प्राप्त झाला होता. यावर्षी देखील सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार जाहीर झाल्याने ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com