esakal | लोकांना ढगात पाठवणारा गांजा जातोय अंतराळ यात्रेला
sakal

बोलून बातमी शोधा

लोकांना ढगात पाठवणारा गांजा जातोय अंतराळ यात्रेला

लोकांना ढगात पाठवणारा गांजा जातोय अंतराळ यात्रेला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

एलन मस्क (Elon Musk) टेक जगतातील एक मोठं नाव. एलन मस्क यांच्या कंपनीला थेट नासा (NASA) चे कॉन्ट्रॅक्ट्स मिळतात. साधारण एक वर्षभरापूर्वी यांनाच गांजाचा धुरका मारताना पाहायला मिळालं होतं. यावर बऱ्याच बातम्या पण झाल्यात. नासा सोबत काम करणाऱ्या कुणीच सार्वजनिक आयुष्यात कोणतही आक्षेपार्ह काम करता कामा नये असं म्हणत, नासा (NASA) ने याच एलन मस्क यांना तंबी देखील दिली होती. आता एक वर्षभरानंतर काय घडलं ते तुम्हीच पाहा. 

मोठी बातमी :  नवी मुंबई शहरातून 'का' होतायत मोलकरणी गायब ?

एलन मस्क (Elon Musk) यांची स्पेस एक्स (Space-X) कंपनी आता अंतरिक्षात गांजा पाठवणार आहे. तशी तयारी NASA ने सुरु केली आहे. मार्च, 2020 मध्ये ही कंपनी ड्रॅगन नामक एक कॅप्सूल अंतरिक्षात पाठवणार आहे. ही बातमी आल्यानंतर लोकांमध्ये परत चर्चा सुरु झाली ती एवढे पैसे खर्च करून  'लोकांना ढगात नेणारा गांजा आता अंतरिक्षात कशाला पाठवला जाणार ? 

एक मोठा प्रयोग : 

एक मोठा प्रयोग करण्यात येणार आहे. यामध्ये फक्त गांजाच नाही तर तब्बल 480 प्रकारच्या वनस्पती अंतरिक्षात पाठवणार आहे. कॉलोराडो युनिव्हर्सिटी एक रिसर्च प्रोजेक्ट करतंय. या माध्यमातून फ्रंट रेंज बायो सायन्स नावाची कंपनी वेगवेगळे प्रयोग करणार आहे. यामध्ये ज्या  वनस्पतीच्या पेशी अंतरिक्षात पाठवण्यात येणार आहेत त्यामध्ये गांजा म्हणजेच हेम्प (Hemp) या वनस्पतीचा देखील समावेश आहे. याचसोबत कॉफीचा देखील यामध्ये समावेश आहे. या प्रयोगामधून शून्य गुरुत्त्वाकर्षणात आणि 'लौकिक किरणं' म्हणजे सूर्याकडून येणारे शक्तिशाली किरणांमध्ये या पेशींवर काय प्रभाव पडू शकतो याचा आभ्यास केला जाणार आहे.

मोठी बातमी : बापाने वाजवला पोराचा गेम, कारण ऐकाल तर सुन्न व्हाल..

यातून काय माहिती मिळेल ? 

वैज्ञानिकांच्या मते अंतरिक्षात या वनस्पती गेल्यानंतर त्यांच्या पेशींचं  उत्परिवर्तन होताना पाहायला मिळेल. म्हणजेच त्यांच्या DNA  बदल झालेले पाहायला मिळतील. यानंतर या वनस्पती  पृथ्वीवर आणल्यानंतर काय बदल होतायत, या वनस्पती पृथ्वीवर परत आल्यानंतरही हे बदल बर्‍याच दिवसांपर्यंत दिसतील का? बदलानंतर या पेशींपासून ज्या वनस्पती तयार होतील त्यातून व्यावसायिक फायदा होईल का? याची सर्व उत्तरं फ्रंट रेंज बायोसायन्स या संस्थेकडे असतील.     

कसा करणार प्रयोग ? 

अंतरिक्षात एक अंतराळ स्थानक आहे (Space Station) आहे . या स्टेशनमध्ये अंडी कृत्रीमरित्या उबवण्याची पेटी ज्याला आपण इनक्यूबेटर असं म्हणतो ती आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (ISS) या  इनक्यूबेटरमध्ये 30 दिवस या वनस्पतींच्या पेशी ठेवणार आहे. प्रयोगादरम्यान वैज्ञानिक या पेशींवर काय परिणाम होतोय याचा आभ्यास करणार आहेत. यानंतर या पेशी परत पृथ्वीवर आणल्यानंतर या वनस्पती पेशींची चाचणी करण्यात येईल. या पेशींच्या DNA मध्ये काय बदल झालेत याचा आभ्यास करण्यात येईल.

मोठी बातमी : मुंबई-पुणे प्रवास होणार वेगवान! मिळाली ‘ही’ परवानगी...

आता राहिला महत्त्वाचा प्रश्न, या गांजामुळे लोकं हाय होऊ शकतात का

गांजा सारख्या मादक पदार्थाचं सेवन केल्यामुळे लोकांना एक प्रकारचा नशा होतो. अनेकजण त्याला कीक देखील म्हणतात. मात्र अंतरिक्षात पाठवण्यात येणारा गांजा हा हेम्प (Hemp) प्रजातीचा आहे. यामध्ये THC म्हणजेच टेट्रा हायड्रो कॅन्नाबिनोल, ज्यामुळे एक प्रकारचा नशा होतो या केमिकलची मात्रा अत्यंत कमी आहे. त्यामुळे यामार्फत कीक बसण्याचं प्रमाण फारच कमी आहे. 

Webtitle : NASA and spacex company to send hemp in space for DNA analysis

loading image