Mokhada News : स्मशानभूमी पर्यंत जाण्याचा प्रवास खडतर; नाशेरा ग्रामस्थांची शोकांतिका

मृत्यू पच्छातही प्रेताच्या नशिबी हेळसांड येत असल्याने नाशेरा ग्रामस्थांमधून संतापाचे वातावरण आहे.
Nashera Village
Nashera VillageSakal

मोखाडा - मोखाडा तालुक्यातील अति दुर्गम नाशेरा गावातील स्मशान भूमिकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अक्षरशः दगड धोंड्यातून खाच खळग्यातून वाट काढीत तब्बल अर्धा किलोमीटर प्रेताला घेऊन नदी काठावरील स्मशान भूमिकडे जावे लागते आहे मृत्यू पच्छातही प्रेताच्या नशिबी हेळसांड येत असल्याने नाशेरा ग्रामस्थांमधून संतापाचे वातावरण आहे.

नाशेरा गाव हे नदीच्या काठावर अक्षरशः बेटावर वसलेले आहे. रोजच्या दिनचर्येचा प्रवासही खडतर असून त्यातही भौतिक साधन सुचितेचाही अभाव असल्याने येथील ग्रामस्थांचा एकूणच प्रशासकीय व्यवस्थे बाबत नाराजीचा सुरु आहे. त्यातही मागील अनेक वर्षांपासुन स्मशान भूमिकडे जाण्यासाठी सोईचा रस्ताच नसल्याने आणि वारंवार मागणी करूनही जिल्हा परिषद बांधकाम विभाग त्याकडे सोईस्करपणे कानाडोळा करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची तीव्र भावना आहे.

एकीकडे विकास कामांवर वारेमाप खर्च करणारे जिल्हा परिषदेचे बांधकाम प्रशासन दुसरीकडे मात्र आदिवासी जणजीवनाशी निगडित असलेल्या सोई सुविधांच्या निर्मितीकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने तालुक्यातून आश्चर्य व्यक्त केले जातं असून बांधकाम प्रशासन आणी पंचायत समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उभे केले जातं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com