Raj Thackeray Slams Tapovan Tree Cutting
esakal
मुंबई
Raj Thackeray : साधूंच्या नावाखाली संधिसाधूपणा! नाशिकमधील तपोवण प्रकरणावर राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका, मनसेच्या सत्ताकाळातील नियोजनही सांगितलं...
Raj Thackeray Slams Tapovan Tree Cutting : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याबाबत त्यांची भूमिका स्प्ट केली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मनसेच्या कार्यकाळात झालेल्या कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबतही सांगितलं आहे.
आगामी २०२७ मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि नाशिक मनपा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून साधू आणि महंत नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. या साधूंच्या राहण्यासाठी साधूग्रामही उभारलं जाणार आहे. मात्र, या साधूग्रामसाठी तपोवन भागातील झालं मोठ्या प्रमाणात तोडली जाणार असल्याची माहिती आहे.
