राष्ट्रीय कृषी विमा योजनेमधून 893 कोटींची रुपयांची भरपाई

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 मार्च 2017

मुंबई - रब्बी हंगाम 2015-16 मधील आठ अधिसूचित पिकांकरिता राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत राज्यातील 26 लाख 88 हजार शेतकऱ्यांना 893 कोटी 83 लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. लातूर विभागात सर्वाधिक सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना 402 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचे वाटप करण्यात येणार आहे. बॅंकांकडून पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

रब्बी हंगाम 2015-16 मध्ये हरभरा, ज्वारी (बागायत व जिरायत), करडई, सूर्यफूल, गहू (बागायत व जिरायत), कांदा, उन्हाळी भुईमूग व उन्हाळी भात ही आठ पिके अधिसूचित कण्यात आली होती. राज्यातील 34.26 लाख शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला होता. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी 56 कोटी 91 लाख विमा हप्ता भरून 24.60 लाख हेक्‍टर क्षेत्राकरिता 2865.40 कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले होते. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांपैकी नुकसानभरपाईस पात्र ठरलेल्या 26.88 लाख शेतकऱ्यांना 893.83 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी शेतकरी विमा हप्ता वजा जाता केंद्र सरकारचा हिस्सा. 408.92 कोटी रुपये व राज्य शासनाचा हिस्सा 408.92 कोटी रुपये असे एकूण 817.84 कोटी रुपये भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भारतीय कृषी विमा कंपनीकडून एकत्रित नुकसानभरपाई 893.83 कोटी रुपयांची रक्कम संबंधित बॅंकांकडे वर्ग करण्यात आली आहे. संबंधित बॅंकांकडून पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर ही रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

विभागनिहाय नुकसानभरपाई अशी -
- नाशिक - 32 लाख 22 हजार 923
- पुणे - 107 कोटी 36 लाख 32 हजार 918
- कोल्हापूर - 10 कोटी 28 लाख 53 हजार 542
- औरंगाबाद विभाग - 340 कोटी 57 लाख 5 हजार 480
- लातूर - 402 कोटी 84 लाख 87 हजार153
- अमरावती - 31 कोटी 76 लाख 84 हजार 537
- नागपूर विभाग - 66 लाख 76 हजार 627
- एकूण लाभार्थी - 26 लाख 87 हजार 613 शेतकरी
(आकडे रुपयांत)

Web Title: National Agricultural Insurance Scheme from Rs 893 crore compensation