
Crime City
Esakal
जयेश शिरसाट
मुंबई : गुन्हेगारी मोडून काढण्यात, आटोक्यात ठेवण्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. लोकसंख्येच्या तुलनेत मोजला जाणारा गुन्ह्यांचा दर किंवा प्रमाणानुसार (क्राइम रेट) कोलकाता, हैदराबाद, पुणे आणि मुंबई ही महानगरे अनुक्रमे पहिल्या चार स्थानांवर आहेत, तर कोची, दिल्ली, सुरत, जयपूर, इंदूर आदी शहरांमधील परिस्थिती चिंताजनक असल्याचे राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोने (एनसीआरबी)) नुकताच जारी केलेला ताजा अहवाल स्पष्ट करतो.