esakal | महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कृती आराखडा
sakal

बोलून बातमी शोधा

accident

महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कृती आराखडा

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार: राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) आपण रोज होणारे अपघात (Accident) बघत असतो. परंतु ते अपघात का होतात. त्यावर काही उपाय आहेत का याबाबत आपण कधी विचार करत नाहीत परंतु राष्ट्रीय महामार्गावर रस्ते बांधकाम (Roade construction) करताना तांत्रिक (Technical) सूत्र काटेकोरपणे वापरले गेले नसल्याने रस्त्यावर अपघात प्रवण ठिकाण अस्तित्वात आले आहेत. महामार्गावरील ब्लॅक स्पॉटमुळे हजारो प्रवाशांना अपघातात (Commuters death) आपला जीव गमवावा लागला आहे. नेमके यासाठी मृत्युंजय दुत म्हणून काम करणार्‍या हरबंस नन्नाडे यांनी या रस्त्यांतील तांत्रिक चुकांवर राज्य सरकारचे (mva government) लक्ष वेधत लोकचळवळ उभारली आहे. त्यामुळे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश देत परिवहन मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.

हेही वाचा: कासा : ग्रामीण भागात गणेशोत्सवानिमित्त पथनाट्यातून जनजागृती

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आठवड्याभरात कृती आराखडा तयार करा, असे निर्देश परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी परिवहन अधिकार्‍यांना दिले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त सौरभ राव, परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे,विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया,सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक,महामार्ग पोलिस दलाचे अधिकारी यांना सदर आदेश देण्यात आले आहेत.

सेव्ह लाईफ या संघटनेने हरबंस नन्नाड यांच्या अभ्यासाची दखल घेत एनएच-48 या महामार्गावर पाहणी करून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाला सादर केलेल्या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या अहवालामध्ये अभियांत्रिकी, अंमलबजावणी, आपत्कालीन प्रतिसाद आणि आवश्यक प्रशिक्षणाबाबत सविस्तर शिफारशी करण्यात आल्या आहेत. या सर्व शिफारशीची परिवहन मंत्रालयाने गांभिर्याने अंमलबजावणी करण्याची मागणी लाऊन धरण्यात आली होती.

राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलेल्या आदेशानंतर येत्या आठवड्यामध्ये कृती आराखडा बनवण्यात येणार आहे. अतिवेग, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, अचानक लेन बदलणे, इंडिकेटर्स, हेडलाईट सुस्थितीत नसणे आदी कारणांनी अपघात होत आहेत. या सर्व बाबींचा सविस्तर विचार करून योग्य त्या सर्व उपायोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस प्रमुखांना महामार्गावर चोवीस तास पेट्रोलिंगसाठी प्रत्येकी एक समर्पित गाडी व टीम तयार करून तात्काळ पेट्रोलिंग सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी काळात महामार्गावर माहिती तंत्रज्ञान आधारित पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे, असेही राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top