esakal | राष्ट्रीय पाठीचा कणा दिन; जीटी रुग्णालयात जवळपास 600 यशस्वी शस्त्रक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

Human Spine

राष्ट्रीय पाठीचा कणा दिन; जीटी रुग्णालयात जवळपास 600 यशस्वी शस्त्रक्रिया

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : शरीरातील सर्व संवेदना पाठीच्या कण्यातून (Spinal Cord) जातात. कणा बाद झाल्यास शरीरही निष्क्रिय होते, असे शरीरशास्त्र सांगते. तर याच पाठीच्या कण्यात व्यंग असल्यास व्यक्ती उभी देखील राहू शकत नाही. अशा व्यंगामुळे किंवा कुबड आल्यास व्यक्ती आतून बाहेरून हेलावून जाते. ती व्यक्ती समाजात चेष्टेचा विषय होतो. मात्र, अशा सामाजिक आणि शारीरिक पातळीवर (human Body) व्यंग ठरलेल्या 600 व्यक्तींच्या पाठीच्या कण्याच्या  शस्त्रक्रिया (Spinal Surgery) करून जीवनात त्यांना मानाचे स्थान मिळवून देण्याचे कार्य राज्य सरकारच्या मुंबईतील जीटी रुग्णालयातील (Mumbai GT Hospital) डॉक्टरांनी केले आहे. डॉक्टरांची ही कामगिरी आजच्या राष्ट्रीय कणा दिनानिमित्त (National Spine Day) समोर आली आहे.

हेही वाचा: माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम SC कडून रद्दबातल; तरीही ३०८ गुन्हे दाखल

दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय पाठीचा कणा दिन पाळला जातो. या निमित्ताने पाठीच्या कण्यासंबंधी विकारांबाबत मार्गदर्शन केले जाते. जीटी रुग्णालयातील डॉक्टरांनी आतापर्यंत जवळपास 627 वाकलेल्या, दबलेल्या, आकार नसलेल्या लहान मुलांसह ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांच्या पाठीच्या कण्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत.

काय आहेत मणक्याचे आजार ?

मणक्याचे सामान्य आजार – गादी सरकणे , गादीला सूज येणे, मज्जातंतू निरुंद होणे, मणक्याला अपघात होणे. मणक्याचा क्षयरोग आणि त्यामुळे होणारे विविध लुळेपणाचे आजार, मणक्याच्या गाठीचे विविध आजार,  मणक्याच्या बाकाचे आजार आणि त्यांचे प्रकार उदा. आनुवांशिक, अनाकलनीय, वयोमानाप्रमाणे होणारे इ.

मणक्याच्या सामान्य आजारांवर शस्त्रक्रिया केव्हा आणि कशासाठी करावी?

गादीचे बरे न होणारे आजार, अथवा असे आजार जे औषधाने अथवा व्यायामाने बरे नाही होत. अशांवर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. कुबडाचे आजार, ज्यात मणक्याचा कोण हा 50 ते 60 अंश पेक्षा अधिक असतो. यावर जीटी रुग्णालयातील तज्ज्ञ सर्जन आधुनिक तंत्रज्ञान वापरुन शस्त्रक्रिया करतात, ज्यातुन जखमा लवकर भरण्यास सोयीचे होते.

गेल्या 10 वर्षापर्यंत मणक्याच्या आजार आणि त्या निगडीत असलेल्या शस्त्रक्रियांबद्दल लोकांमध्ये बरेच गैरसमज आणि भीती होती, पण सध्याच्या आधुनिक काळात नवीन तंत्रज्ञानचा वापर करण्यात येत असून आतापर्यंत 600 हून अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया मोफत केल्या गेल्या आहेत, असे मज्जातंतू शल्यचिकित्सक डाॅ. अजय चंदनवाले यांनी सांगितले.

हेही वाचा: 'मंदिरं बंद आहेत, मग देव कुठे आहे?, तर देव...'

शस्त्रक्रियांचे प्रकार

धव्नीलहरी कार्यरत बोन स्कॅल्पेल – ह्या यंत्रणे मध्ये असे वैशिष्ट्य असते की फक्त हाड कापले जाते आणि आजूबाजूच्या पेशींना बिलकुल इजा होत नाही.

3 डी - सीएसआर एम

सुचालन शोधयंत्र – ह्या द्वारे  शस्त्रक्रिये दरम्यान विविध प्रकारचे माप वेगवेगळ्या अनुषंगाने घेऊन चीत्ररुपित माध्यमात दर्शवले जाते, एकप्रकारे गुगल  अथवा जीपीएस सारखेच हे यंत्र असते.

दुर्बिण द्वारे शस्त्रक्रिया – ज्या शस्त्रक्रिया मोठा चिरा घेऊन आधी करावे लागत असे त्या शस्त्रक्रिया आजकाल दुर्बीण्द्वारे कमीतकमी चिरे / टाके घेऊन करणे साध्य झाले आहे. दुर्बिणेद्वारे अशा शस्त्रक्रियेचे चिर हे अगदी 0.5 सेंटीमीटर एवढे असते असे युनिट प्रमुख डाॅ. धीरज सोनावणे यांनी सांगितले. 

 जीटी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया

 गोकुळदास तेजपाल शासकीय रुग्णालयात होणाऱ्या सर्व मणक्याच्या शस्त्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अगदी सुरक्षित आणि यशस्वीरित्या ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत पूर्णपणे मोफत केल्या जातात.

"प्रत्येक महिन्याला कोविडच्या आधी महिन्याला 20 ते 25 शस्त्रक्रिया होत होत्या. देशातून आणि परदेशातूनही रुग्ण येतात. 2 वर्षांपासून ते 80 वर्षाच्या वयोगटातील शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत."

डाॅ. धीरज सोनावणे, पाठीचा कणा चिकित्सक, जीटी रुग्णालय

loading image
go to top