esakal | नाट्य परिषदेचा कारभार पारदर्शी : प्रसाद कांबळी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नाट्य परिषदेचा कारभार पारदर्शी : प्रसाद कांबळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नाट्य परिषदेने केलेले आतापर्यंतचे सगळे व्यवहार पारदर्शी आणि स्वच्छ आहेत. पूर्वी होणारा भ्रष्टाचार आम्ही बंद केला. यातून आम्ही परिषदेला चांगला रस्ता दाखविला. नाट्य परिषदेचा सगळा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेवर भ्रष्टाचार आणि मनमानीचे आरोप विरोधी सदस्यांकडून करण्यात आले होते. त्याबद्दल आपले म्हणणे मांडण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेला अध्यक्ष प्रसाद कांबळी, प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे, प्रवक्ते मंगेश कदम आणि कोपाध्यक्ष नाथा चितळे, योगेश सोमण ही मंडळी उपस्थित होती.

हेही वाचा: मुंबईतील 'या' परिसरात पाणी कपात; काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा

कार्यकारिणीतील काही सदस्यांनी अधिकार नसताना नियामक मंडळाची बैठक घेऊन अध्यक्षावर अविश्वास आणून हंगामी अध्यक्ष निवडला, ते सारे नाट्य परिषदेच्या घटनेनुसार अवैध असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

loading image
go to top