esakal | मनसेची हंडी फोडणारे कार्यकर्ते ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मनसेची हंडी फोडणारे कार्यकर्ते ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : राज्य सरकारने दहीहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी नाकारली असतानादेखील मनसेने (MNS) दहीहंडी (Dahi Handi) उत्सव साजरा करण्याचा निर्धार केला होता. त्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांपासून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यात सोमवारी रात्री कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केल्यानंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) ठाणे (Thane) शहरातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर हंडी बांधून कार्यकर्त्यांनी हंडी फोडून दिला शब्द पाळला, असा दावा मनसैनिकांनी (MNS) केला आहे.

त्यानंतर नौपाडा (Naupada) पोलिसांनी (Police) हंडी फोडणाऱ्या सहा ते सात जणांना ताब्यात घेतले; तर दुसरीकडे वर्तकनगर (Vartak Nagar) पोलिसांनी लक्ष्मी पार्क (Laxmi Park) येथे हंडी उभारून फोडणाऱ्या मनविसेनेच्या (MNVS) चौघांना ताब्यात घेतले.

सोमवारी सकाळी भगवती मैदान येथे मंडप उभारत असताना, नौपाडा पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह १८ जणांविरोधात कारवाई केली. पोलिसांनी मनसेच्या दहीहंडीला परवानगी नाकारली होती. या वेळी आम्ही दहीहंडी उभारणार असल्याचा दावा मनसेने केला होता. त्यानुसार, सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयाकडे धाव घेतली होती. कृष्ण जन्माष्टमी झाल्यानंतर कार्यालयाबाहेर हंडी बांधून ती हंडी फोडण्यात आली.

हेही वाचा: 'याच' वेळी साेडा काेयना धरणातील पाणी : गृहराज्यमंत्र्यांची सूचना

याच वेळी नौपाडा पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत हंडी फोडणाऱ्या सहा ते सात कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. जमलेल्या कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. या वेळी मनसे नेते अभिजित पानसे आदी पदाधिकारीही उपस्थित होते. या वेळी दहीहंडी उभारू देत नसल्याने आम्ही रात्री पक्ष कार्यालयाबाहेर हंडी बांधून फोडली. आम्ही दिलेला शब्द पाळला. तसेच बाळासाहेबांचे हिंदुत्व शिवसेनेतून संपले आहे. आमच्यासाठी सण महत्त्वाचे आहेत, हे दाखवून दिले असल्याची प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली

हेही वाचा: जर ठाण्यात रोखलं, तर दादरमध्ये दहीहंडी साजरी करु - संदीप देशपांडे

  • ठाण्यात मनविसेने फोडली दहीहंडी ; चौघे ताब्यात

ठाण्यात कोरोना निर्बंधांचा निषेध म्हणून ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनानुसार मनविसे विभाग सचिव मयूर तळेकर व उपशहराध्यक्ष संदीप चव्हाण यांनी वर्तकनगर येथील लक्ष्मी पार्क येथे दहीहंडी बांधली होती. गोविंदांनी हे निर्बंध झुगारत ही हंडी फोडून मनसेचा झेंडा फडकवला. याप्रकरणी चौघांना वर्तकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.

loading image
go to top