

Vashi Cylinders Blast
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई परिसरातील वाशी नाका परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. एकामागोमाग एक अशा अनेक सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सिलेंडरच्या स्फोटांच्या मोठ्या आवाजामुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.