धक्कादायक! एकाच कुटुंबातील ८ जणांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 April 2020

राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतानाच, नवी मुंबईतील बाधित रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुरुवारी (ता.2) समोर आलेल्या अहवालातून तब्बल 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे या 9 जणांमध्ये एकाच कुटुंबातील 8 जणांचा समावेश आहे.

नवी मुंबई : राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतानाच, नवी मुंबईतील बाधित रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुरुवारी (ता.2) समोर आलेल्या अहवालातून तब्बल 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे या 9 जणांमध्ये एकाच कुटुंबातील 8 जणांचा समावेश आहे.

ही बातमी वाचली का? यांना आवरा रे! तळीरामांची तहान भागवण्यासाठी फोडली जातायेत वाईन शॉप्स...

नवी मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या बुधवारपर्यंत 13 इतकी होती. यात वाशीच्या मशिदीत जाणाऱ्या एका व्यक्तीचा समावेश होता. या व्यक्तीच्या घरातील सदस्यांचे नमुने तपासणीसाठी खाजगी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाल्यानंतर, एकाच घरातील 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर नेरूळ सेक्‍टर 28 येथील एका सोसायटीत राहणाऱ्या युवकाला, त्याच्या मुंबईतील कार्यालयातून कोरोनाची लागण झाली होती. या तरुणापासून त्याच्या घरातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली. या सर्वांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. 

ही बातमी वाचली का? ...म्हणून त्यांनी बिबट्याला जिवंत जाळून हत्या केली

फेरतपासणी करणार 
गुरुवारी समोर आलेल्या सर्व कोरोना बाधित 9 जणांचे अहवाल हे खाजगी प्रयोग शाळेतून आले. त्याआधी आलेले दोन जणांचे नमुने हे देखील खाजगी प्रयोगशाळेमधूनच आले होते. सरकारी प्रयोगशाळेपेक्षा खाजगी प्रयोगशाळेची विश्वासहर्यता कमी असते. त्यामुळे आवश्‍यकता भासल्यास या रुग्णांची फेरतपासणी करू, असे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Navi Mumbai 9 corona patients