

नवी मुंबईत तरुण दाम्पत्य एनएमएमटीच्या एसी बसमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत आढळलं होतं. रविवारी सायंकाळी पनवेलहून कल्याणला जाणाऱ्या बसमध्ये ही घटना घडली होती. या घटनेचा २२ सेकंदाचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर बस वाहकाच्या बेजबाबदारपणाबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेकडून वाहकावर कारवाई करण्यात येणार आहे.