नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्या, मनसेची मागणी

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्या, मनसेची मागणी

मुंबईः ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली. तरी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी ठाम भूमिका मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी घेतली आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई करांमधून लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. नवी मुंबईतील जमिनी जेव्हा जे एन पी टी, सिडको १९८० च्या दरम्यान ताब्यात घेत घेऊन शेतकऱ्यांना, प्रकल्पग्रस्तांना अत्यंत एकरी केवळ १० ते २० हजार रुपये मोबदला दिला जात होता. स्व. दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठा लढा उभारण्यात आला, असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे.

१९८४ च्या प्रसिद्ध उरण परिसरातील आंदोलनात ५ जण शहिद झाले. आंदोलनाची तीव्रता बघून सरकारने १८९४ चा ब्रिटिशकालीन अन्यायकारक भूसंपादन कायदा बदलून नवीन कायदा केला आणि भूमिपुत्रांना १२.५% जमीन मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. लोकनेते दि बा पाटील यांनी आगरी कोळी समाजाला शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळा, महाविद्यालये उभी केली, असंही त्यांनी सांगितलं आहे.

दि. बा. पाटील विधानसभेत ४ वेळा आमदार, विरोधी पक्षनेता होते. तसेच लोकसभेत दोन वेळा खासदार होते. दोन्ही सभागृहातील त्यांची कामगिरी अत्यंत प्रभावी होती. नवी मुंबईतील भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांच्या त्यागाचे प्रतीक म्हणून नवी मुंबई विमानतळाकडे बघितले जाते. त्यामुळे लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळासाठी योग्य असल्याचे मनसेने मत व्यक्त केलं आहे.

Navi Mumbai Airport Give the name late d ba Patil demand Gajanan Kale MNS

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com