

Navi Mumbai Airport Travel
ESakal
नवी मुंबई : 'भारतीय विमानतळ आर्थिक : नियामक प्राधिकरण'ने नवी मुंबई विमानतळासाठी सुधारित व्हेरिएबल टॅरिफ प्लॅनला मंजुरी दिल्याने येथून नव्याने विमानसेवा सुरू करणाऱ्या कंपन्यांना लँडिंग शुल्कात भरीव सवलत मिळणार आहे. त्यामुळे पर्यायाने नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय मार्गावरील नव्याने सेवा सुरू होणाऱ्या मार्गावरील तिकीटदर कमी होण्याची शक्यता आहे.