

Navi Mumbai Airport
ESakal
अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन झाले. नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्यात येणार आहे. यामुळे आता प्रवासीकेंद्री जोड विमानतळ प्रारूप, अत्याधुनिक टर्मिनल्स आणि वैश्विक स्तरावरील सुविधा यांच्या माध्यमातून हे विमानतळ क्षमता, सोय आणि कनेक्टिविटी यांचे नवीन मापदंड स्थापन करणार आहे. तसेच दुबई, लंडन आणि न्यूयॉर्क या जगातील सर्वोत्तम विमानतळांच्या तोडीचे ठरणार आहे.