
तुर्भे : बेलापूर जेट्टी येथील बहुचर्चित 'क्रूझ' सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी समुद्री पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्यांची निराशा होत आहे. तरी या ठिकाणची क्रुझ सेवा लवकर सुरू करावी अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.