
Navi Mumbai Housing Scems: ‘माझे पसंतीचे घर’ या गोंडस नावाखाली सिडकोने काढलेली घरांची योजना पुन्हा रखडण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत या योजनेला सिडकोने दोन वेळा मुदतवाढ दिली आहे. योजनेची नावनोंदणी संपल्यानंतर घरांच्या किमती सिडको जाहीर करणार आहे. घरांच्या किमतींबाबत एकमत होत नसल्याने वारंवार मुदतवाढ मिळत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होत असताना घाईघाईत सिडकोने १२ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात केली. पहिल्या २३ तासांत सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेला जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अवघ्या २४ तासांत तब्बल १२,४०० ऑनलाइन अर्जांची प्राप्ती झाली.