
नवी मुंबई : नवी मुंबईचा (Navi Mumbai) सर्वांगीण विकास व्हावा याकरिता सिडकोने (cidco) आजतागायत केलेले काम हे निश्चितच कौतुकास्पद आहे, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांनी काढले. सिडकोने नवी मुंबईतील कळंबोली आणि मुंबईतील कांजूरमार्ग येथे उभारलेल्या कोविड समर्पित आरोग्य केंद्रांचे (corona health center) ई-लोकार्पण आणि सिडकोने आयोजित केलेल्या सिडको इन्व्हेस्टमेन्ट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर समीटचे ई-अनावरण दूरस्थ पद्धतीने झाले. याप्रसंगी ठाकरे यांनी सिडकोचे कौतुक केले.
याप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पनवेल महापालिकेच्या महापौर कविता चौतमोल, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे नगरविकास आदी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. कळंबोलीतील कोविड आरोग्य केंद्र पूर्णपणे वातानुकूलित असून, या केंद्रामध्ये एकूण ६३५ खाटा आहेत. त्यात ५०५ ऑक्सिजनयुक्त खाटा, १२५ आयसीयू खाटा, तसेच पाच खाटा या आपत्कालीन कक्षासाठी राखीव असणार आहेत.
रुग्णालयात दाखल केलेल्या अर्भकांची तसेच लहान मुलांची काळजी घेण्यासाठी २४ खाटांचे मदर लाऊंजही प्रस्थापित केले आहे. संपर्करहित तपासणी कक्ष, डॉक्टर आणि रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेश मार्ग, रुग्णांच्या देखरेखीसाठी आणि उपचारांसाठी हे आरोग्य केंद्र सीसीटीव्ही, पब्लिक अॅड्रेस सिस्टीम, आवश्यक आयटी इन्फ्रास्ट्रक्चर व वायफाय प्रणाली आदी सुविधाही विकसित केल्या आहेत. कांजूरमार्ग येथील कोविड आरोग्य केंद्रामध्ये १,७३८ खाटांपैकी ऑक्सिजनयुक्त ११५६ खाटा, ३७२ विलगीकरण खाटा, तसेच १० खाटा या आपत्कालीन कक्षासाठी राखीव असणार आहेत. रुग्णालयात दाखल केलेल्या अर्भकांची तसेच लहान मुलांची काळजी घेण्यासाठी ४४ खाटांचे मदर लाऊजही प्रस्थापित केले आहे. त्याचप्रमाणे २१० अतिदक्षता खाटा असून, यातील ५० आयसीयू खाटा लहान मुलांसाठी समर्पित आहेत.
"कांजूरमार्ग व कळंबोली येथे सिडकोकडून उभारलेली कोविड समर्पित आरोग्य केंद्रे ही आपण कोविडच्या संकटाविरुद्ध लढण्यास सदैव सज्ज आहोत, याची निदर्शक असल्याचे सांगत सिडको इन्व्हेस्टमेन्ट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर समीटच्या माध्यमातून सिडको नवी मुंबईमध्ये करीत असलेली विकासकामे सर्वांपर्यंत पोहोचणार आहेत."
- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री
"सिडकोकडून राबविण्यात येणारे विकास प्रकल्प राज्याच्या विकासातही योगदान देणारे ठरतील. सिडको इन्व्हेस्टमेन्ट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर समीटच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणावर वाव आहे."
- एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे
"कळंबोलीतील समर्पित आरोग्य केंद्राच्या रूपाने कोविड रुग्णांवर उपचार करण्याकरिता एक सुसज्ज रुग्णालय उपलब्ध झाले आहे. या केंद्रात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक रुग्णांकरिता स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधानी आहे."
- अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.