esakal | नवी मुंबई : उग्र, रासायनिक वासाने नागरिक हैराण
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नवी मुंबई : उग्र, रासायनिक वासाने नागरिक हैराण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तुर्भे : शहरातील विविध नाल्यात रासायनिक कारखान्यातून नेहमीच उम्र वास असलेले रसायन सोडले जाते. यामुळे नागरिकांच्या शरीरावर विपरीत परिणाम होणार याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञाकडून नेहमीच व्यक्त केली जात होती.

परंतु या प्रकारांमुळे घणसोली परिसरात गुरुवारी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या पन्नास वर्षीय महिलेला भोवळ आली. ३ (बातमीदार) नवी मुंबई महापालिका परिसरात दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून पूर्वेला असणाऱ्या औद्योगिक क्षेत्रातून घणसोली, जुईनगर, पावणे, नेरूळ, कोपरखैरणे, शिरवणे परिसरात असलेल्या नाल्यात रसायन मिश्रीत पाणी सोडले जाते. त्याचा उग्र वास येत असल्याने नाल्यालगत वास्तव्यास असणारे व पादचाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होतो, गंभीर आजार असणारे नागरिक तर कमालीचे अस्वस्थ होतात. गुरुवारी पहाटे आंबट प्रकारच्या उग्र वासाने घणसोली सिम्प्लेक्स येथील महिला अलका वाळूंज यांना चक्कर आली.

हेही वाचा: नवी मुंबई : दुचाकी चोरणारे अल्पवयीन ताब्यात

त्याच वेळी नवी मुंबई पालिकेचे कर्मचारी करण म्हात्रे कामावर जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी आणि इतर पादचाऱ्यांनी महिलेस वेळीच मदत केली आणि घरी सोडले. सांडपाणीही नाल्यात रासायनिक द्रव्यास एमआयडीसी प्रशासन कारणीभूत आहेत. नाल्याशेजारी असणारी घरे, इमारतीच्या मलवाहिन्यांमधील सांडपाणीही त्यात सोडले जाते. त्यामुळे कायम परिसरात उग्र वास येत असतो. महापालिका प्रशासन तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत योग्य तोडगा करण्याची मागणी शहर संघटक संदीप गलगुडे यांनी केली आहे.

loading image
go to top