esakal | नवी मुंबई : दुचाकी चोरणारे-अल्पवयीन ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नवी मुंबई : दुचाकी चोरणारे अल्पवयीन ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीन तरुणांना गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने ताब्यात घेतले आहे. दोघांकडून ४ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी हस्तगत केल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे शाखेचे उपआयुक्त सुरेश मेंगडे (Suresh Mengade) यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबई परिसरातून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. दररोज वाहनचोरीचे एक-दोन गुन्हे दाखल होत आहेत. चोरट्यांना जेरबंद करण्याच्या सूचना आयुक्त बिपिनकुमार सिंह व गुन्हे शाखेचे अपर आयुक्त घुर्ये यांनी दिले होत्या. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या तपासात काही अल्पवयीन तरुण मौजमजेसाठी वेगवेगळ्या ठिकाणांवरून दुचाकी वाहने चोरून पेट्रोल संपल्यानंतर ती त्याच ठिकाणी सोडून देत असल्याचे आढळून आले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने उलवे भागातून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

हेही वाचा: ..‘त्यांनी’ थांबवलं, थोडी भीती वाटली!

चौकशीत त्यांनी इतर साथीदारासह नवी मुंबई, मुंबई, मीरा-भाईंदर परिसरातून ९ दुचाकी चोरल्याची कबुली दिली, आणखी गुन्ह्यांची शक्यता पोलिसांनी अल्पवयीन मुलांकडून ४ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. कारवाईत चोरीचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह भोसले, सहायक निरीक्षक राजेश गज्जल, ज्ञानेश्वर भेदोडकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

loading image
go to top