गारठा वाढलाय! पाहा नेमका कशामुळे...'तो'

अचानक गारठा वाढलाय! पाहा नेमका कशामुळे...'तो'
अचानक गारठा वाढलाय! पाहा नेमका कशामुळे...'तो'

नवी मुंबई : डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शहरात थंडीची चाहूल लागली. आणि नव्या वर्षाच्या आगमनाबरोबरच वातावरणातील गारठाही वाढला आहे. डिसेंबर अखेरीस 20 ते 22 अंश सेल्सिअसवर असलेला पारा बुधवारी (ता.1) रात्री 5 अंशांनी घसरला. त्यामुळे संध्याकाळनंतर नवी मुंबईकरांना स्वेटर, कानटोप्या, शाल, मफलर घेऊन बाहेर पडावे लागले. गुरुवारीही सकाळी तापमान 28 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले, तर दुपारी 4 वाजेनंतर पारा 22.85 अंशांवर घसरला होता. 

डिसेंबर महिन्याच्या मध्यावधीपर्यंत शहरात थंडीचा मागमूसही नव्हता. मात्र, डिसेंबरच्या शेवटच्या दोन-तीन दिवसांत थंडीची चाहूल लागली आणि नवीन वर्षात थंडीने जोर धरला. उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह सुरू झाल्याने कमाल आणि किमान तापमानातही घट झाली आहे. 29 व 30 डिसेंबरला अनुक्रमे 32 व 30 अंशांवर असलेल्या तापमानात किंचित घट होऊन 31 डिसेंबरला कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस नोंदवले गेले; तर 20 अंशांवर असलेले किमान तापमान 1 जानेवारी रोजी 15 अंश सेल्सिअस होते. दिवसा ऊन असले व काहीसे ढगाळ वातावरण असले, तरी तापमानात फारसा फरक पडलेला नाही. गुरुवारी (ता.2) कमाल तापमानात एक अंशाची घट नोंदवण्यात आली. सकाळी तापमान 28 अंश सेल्सिअस, तर संध्याकाळनंतर तापमान 20 अंश से. नोंदवण्यात आले. उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र आहे. तेथून थंड वाऱ्यांचे प्रवाह राज्याच्या दिशेने येत आहेत. तसेच मध्य महाराष्ट्र, कोकण विभागात हवामान कोरडे झाल्याने थंडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, काही दिवस गारठा कायम राहील, असे हवामान विभागामार्फत सांगण्यात आले. 

तापमान 
दिवस             कमाल     किमान (अंश सेल्सिअसमध्ये) 
30 डिसेंबर :       30           20 
31 डिसेंबर :       29           16 
1 जानेवारी :      29            15 
2 जानेवरी :       28            20 
3 जानेवारी :      29           20 (अंदाजित) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com