चाकरमान्यांचा गणेशोत्सव यंदा मुंबईतच; ई-पाससाठी पोलिसांकडे केवळ 4 हजार अर्ज

अनिश पाटील
Saturday, 15 August 2020

मुंबई पोलिसांकडे ई-पाससाठी केवळ चार हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील बहुतांश अर्ज कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे आहेत.

मुंबई : लॉकडाऊनदरम्यान गणेशोत्सवासाठी गावी जाणे सोयीच व्हावे, यासाठी ई-पास काढताना गणेशोत्सवाचाही पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला होता. यापूर्वी अत्यावश्यक सेवा, नातेवाईकांच्या मृत्यूसंबधी प्रवास, वैद्यकीय कारण किंवा इतर महत्त्वाच्या कारणांसाठीच  ई-पास मिळत होता. त्यात गणेशोत्सवाचा पर्यायही सामील झाल्याने चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, गेल्या पाच दिवसांत मुंबईतून इतर जिल्ह्यात गणेशोत्सवाकरीता जाण्यासाठी चाकरमान्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

कामगार तर मुंबईत परतायत; मात्र हाताला पुरेसे कामच नसल्याने करायचे तरी काय?

कोरोना संकटामुळे बहुतांश चाकरमान्यांनी गावी जाण्याऐवजी यंदा मुंबईतच गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलिसांकडे गणेशोत्सवासाठी गावी जाण्याकरीता ई-पाससाठी केवळ 4 हजार अर्ज आले आहेत. खासगी अथवा भाडे तत्त्वावरील गाड्यांसाठी गेल्या पाच दिवसांत हे अर्ज करण्यात आल्याचे, एका अधिकाऱ्याने सांगितले. गेल्यावर्षी सुमारे सहा लाख चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात गेले होते.

मुंबईकरांनो काळजी घ्या! मलेरिया फोफावतोय, जुलै महिन्यात रुग्णांमध्ये दुपटीने वाढ...महापालिकेचे आवाहन

मुंबई पोलिसांकडे ई-पाससाठी केवळ चार हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील बहुतांश अर्ज कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे आहेत. फक्त खासगी वाहनाने जाणा-यांसाठी हा पास देण्यात आला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा फार कमी आहे. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानिक उपायुक्तांना ई-पासचे अधिकार देण्यात आले होते.

ठाणेकर तयारी करा! उद्यापासून 'या' वेळेत सुरु होतील दुकानं, असे असतील नियम

विनाकारण पास देण्यात दिरंगाई न करण्याचे आदेशही देण्यात आले होते. पहिल्या अर्जास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ई-पास देण्यात येत होते. गावी गेल्यानंतर चाकरमान्यांना प्रथम 10 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार असल्यामुळे 12 ऑगस्टला ही सुविधा बंद करण्यात आली आहे. पण, या पाच दिवसांत केवळ चार हजार ई-पाससाठी अर्ज आले आहेत.

सामनाचा आजचा अग्रलेख 'आजोबा- नातवा' वर, शिवसेनेला वाटतंय...

कोरोना संकटात गावी गेल्यास क्वारंटाईन राहावे लागते. तेथे कशी व्यवस्था असेल, याची माहिती नाही. तसेच माझे वडील 72 वर्षांचे आहेत. त्यांना अशा परिस्थितीत गावी नेणे धोकादायक असल्यामुळे यावर्षी आम्ही चुलत भावंडांनी मुंबईतच गणपती आणण्याचा निर्णय घेतला आहे.
- आशिष गावडे, चाकरमानी

---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this year there is very few peoples goes to konkon for ganesh festival amid corona