

6 girls missing in Navi Mumbai
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या हद्दीत मुली बेपत्ता होण्याचे गेल्या दोन दिवसांपासून सत्र सुरू आहे. रबाळे, एपीएमसी आणि कोपरखैरणे ठाण्यांच्या हद्दीतून चार मुली गायब झाल्याच्या ताज्या प्रकरणानंतर, तुर्भे आणि एनआरआय सागरी पोलीस ठाण्यांतून आणखी दोन मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शोध सुरू केला आहे. मात्र दोन दिवसांनंतर मुली परत न आल्याने पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.