मुंबई : गेल्या काही दिवसांपासून क्राईमच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे समोर येत आहे. अशातच नवी मुंबईतील ऐरोलीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खासगी कॉम्प्युटर क्लास चालवणाऱ्याने त्याच क्लासमधील शिक्षिकेचा विनयभंग केल्याची माहिती उघडकीस आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून या घटनेने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.