

Koparkhairane Police Arrest Main Accused
esakal
Koparkhairane Firing Incident: What Happened : नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात दिवाळीच्या उत्साहाला गालबोट लागणारी धक्कादायक घटना घडली आहे. सेक्टर-१ मधील एसएस-३ परिसरात गुरुवारी (ता. ५) रात्री दोन तरुणींवर गोळीबार करण्यात आला. प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, दुसरा आरोपी फरार आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा