

Student beaten by tuition teacher
ESakal
Student beaten by teacher Navi Mumbai : आठवडाभरापूर्वी आमगाव तालुक्यात गोरठा येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका विद्यार्थ्याने लॉलीपॉप मागितल्याच्या कारणावरून शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. इतकेच नव्हे तर गोंदियामध्ये कोणतेही कारण नसताना शाळेच्या पटांगणात खेळत असलेल्या पाचवीच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने वर्गखोलीत नेऊन बेदम मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनांनंतर पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे प्रकरण ताजे असतानाच नवी मुंबईत शिक्षिकेकडून आठवीच्या मुलीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.