
नवी मुंबई : सीबीडी बेलापूर येथील शहाबाज गावालगत पदपथावर झोपलेल्या प्रकाश लोखंडे (वय ६५) यांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी (ता. ८) पहाटे घडली. अभिषेक पाल (वय ३५) असे आरोपीचे नाव असून, घटनेनंतर नागरिकांनी त्यास पकडून बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीने लोखंडे यांची हत्या का केली, याचा सीबीडी पोलिस तपास करीत आहेत.