नवी मुंबई : सीबीडीतील मसाज पार्लरवर कारवाई; दोन महिलांसह तिघे ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

spa center

नवी मुंबई : सीबीडीतील मसाज पार्लरवर कारवाई; दोन महिलांसह तिघे ताब्यात

नवी मुंबई : मसाज पार्लरच्या (Massage parlor) नावाखाली ग्राहकांसोबत अश्लिल चाळे करून अनैतिक धंदे (illegal business) करणाऱ्या सीबीडीतील द थाई विला वेलनेस स्पा (spa in cbd) वर सीबीडी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी कारवाई केली. या वेळी दोन महिलांसह तिघांना ताब्यात घेण्यात (police FIR) आले. सीबीडी सेक्टर-१५ मधील द थाई विला वेलनेस स्पा मध्ये मसाजच्या नावाखाली ग्राहकांसोबत बीभत्स व अश्लील चाळे करण्यात येत असल्याची माहिती सीबीडी पोलिसांना (CBD Police) मिळाली होती.

हेही वाचा: ...म्हणून केला प्राणघातक हल्ला; मुंबईच्या विलेपार्लेत एकावर चाकुने वार

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी कारवाईच्या सूचना दिल्‍या होत्‍या. साहायक पोलिस निरीक्षक पवन पाटील व त्यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी स्‍पा सेंटरवर छापा मारला. यावेळी कामास असलेल्या दोन महिला एका ग्राहकांसोबत मसाजच्या नावाखाली अश्लील चाळे करीत असल्‍याचे आढळले. पोलिसांनी दोन महिलांसह स्पाचा व्यवस्‍थापक महम्मद अफजल खान (२७) तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top